LPG सिलेंडरवर उपलब्ध आहे सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही ते तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडरवर सरकारकडून पुन्हा एकदा सबसिडी दिली जात आहे. सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये ते 237.78 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत सबसिडी दिली जात आहे. अशा परिस्थितीत सबसिडीचे पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही तुमचे बँक खाते तपासावे.

सबसिडी बाबत अडचण
एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलेंडर 79.26 रुपये सबसिडी म्हणून मिळत आहे. सबसिडी मध्ये किती पैसे मिळतात, असा संभ्रम अनेकांच्या मनात होता. लोकांना सबसिडीमध्ये 79.26 रुपये मिळत आहेत तर काहींना 158.52 रुपये किंवा 237.78 रुपये मिळाले आहेत.

तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे घरबसल्या तपासा
>> सर्वप्रथम तुम्हाला इंडियन ऑइलच्या https://cx.indianoil.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
>> आता तुम्हाला Subsidy Status वर क्लिक करून पुढे जावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला Subsidy Related (PAHAL) या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.
>> तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि एलपीजी आयडी टाकावा लागेल.
>> त्यानंतर व्हेरिफिकेशन करून सबमिट करा.
>> यानंतर तुम्हाला समोर संपूर्ण माहिती मिळेल.

या लोकांना एलपीजी सबसिडी मिळते
एलपीजीची सबसिडी प्रत्येक राज्यांमध्ये वेगळी आहे, ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून जास्त आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या मिळकतीसह असावे.

14 किलो सिलेंडरचे वजन कमी होऊ शकते
केंद्र सरकार घरगुती एलपीजी सिलेंडरचे वजन कमी करण्याच्या तयारीत आहे. 14.2 किलो वजनाचे गॅस सिलेंडर वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सरकार त्याचे वजन कमी करण्यासह विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Leave a Comment