आता Aadhar Card शिवायही मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, फक्त करावं लागणार “हे” काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग (Gas Cylinder booking) केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस कनेक्शनसोबत तुमचे आधार कार्ड लिंक असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा कोणत्याही कारणास्तवर आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन लिंक नसेल तरी देखील आता सबसिडी मिळवू शकता. मात्र यासाठी काय करावे लागेल ते जाणून घेऊया.

१) गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल

२) ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल

३) बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल.

४) ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्याच ग्राहकांना ही सुविधा देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी असं लिंक करा तुमचं आधार कार्ड

१) सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल

२) यानंतर आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जा. याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील.

३) यामध्ये बेनिफिट टाईपमध्ये एलपीजी, स्कीमचं नाव, आणि वितरकाचं नाव तसेच ग्राहक क्रमांका टाका.

४) आधार नंबर टाकण्याआधी तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.

५) सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर मोबाईल, ई-मेलवर एक ओटीपी येईल.

६) वन टाईम पासवर्ड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment