व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कांद्याचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडलेलया कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच आमचं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना शिंदे म्हणाले, भारत देश कांदा उत्पादनात अग्रेसर असून जगभरातील कांद्याच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा २६ % आहे. भारतामध्येही सर्वाधिक उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. देशातील एकूण कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४३% आहे. सध्या बाजारातील लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. लाल कांद्याची साठवणूक क्षमता मुळे देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढलं आहे. आणि ग्राहकांकडून आवश्यकतेनुसार कांद्याची खरेदी सुरु असल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे.

शेतकरी मित्रानो, आता सरकारी अनुदान मिळवणे अगदी सोपे झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे अँप आजच तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आणि सरकारच्या सर्व योजनांचा घरबसल्या लाभ घ्या. हॅलो कृषीच्या माध्यमातून थेट शेतकरी ते ग्राहक अशी शेतमालाची विक्री करता येते. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. याशिवाय Hello Krushi मध्ये रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज या सुविधाही मिळतात. तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार, कृषी केंद्र यांच्याशी थेट संपर्क साधून देणार अँप म्हणजे हॅलो कृषी. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण एक समिती नेमली होती. या समितीत सर्वंकष निकष झाल्यांनतर त्यांनी प्रतिक्विंटल २०० किंवा ३०० रुपयांची शिफारस केली होती. त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार असून आमच्या या निर्णयाने कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल असं एकनाथ शिंदे म्हणाले.