Success Story : तरुण शेतकऱ्याची मोठी कमाल एकरात घेतले लाखों रुपयांचे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इचलकरंजी : हॅलो महाराष्ट्र – माणगाव येथील एका २२ वर्षीय तरुणाने कठीण परिश्रम आणि अपार कष्टाच्या जोरावर उसाच्या शेतीतुन कमाल केली आहे. या तरुणाने एक एकरात १०० टन उसाचे उत्पादन घेऊन त्याने अनेक तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. हा तरुण परंपरागत शेती सोडून काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने शेती करतो. या तरुण शेतकऱ्याचे नाव वैभव शेरीकर असे आहे. जर तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता हेच या तरुणाने दाखवून दिले आहे.

ज्या वयामध्ये मुले आपल्या वडिलांचा हात धरून स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात त्या वयामध्ये वैभवच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. पण वैभवने हार न मानता वडिलोपार्जीत वाट्याला आलेल्या शेतजमिनीत नव काहीतरी करण्यासाठी अग्रेसर असतो. त्याने रसायनशास्त्र विषयातून पदवीपूर्ण शिक्षण चांगल्या गुणाने पूर्ण करत जयसिंगपूर कॉलेज येथे तो पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याने शेती करण्याचा ध्यास मनाशी बाळगला पण त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही.

वैभव हा दिवसातील काही वेळ शिक्षणासाठी आणि राहिलेला वेळ कुटुंबाचे संगोपन व शेती यामध्ये गुंतलेला असतो. यंदा शेतात घेतलेले उसाचे पीक व त्यातून निघालेले एक एकरात १०० टन ऊस उत्पादन हे यश वैभवच्या कष्टाला बळ देणारे आहे. वैभवने शेतीच्या मशागतीसाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचे नेटके नियंत्रण त्याने ऊस पिकासाठी निश्‍चित केले आहे. त्याने रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतावर अधिक भर दिला आहे. त्याने निरा ८६०३२ या ऊस बियाणांची लागवड केली आहे. त्याने वेळोवेळी बियाणांच्या वाढीसाठी उपयुक्त मूलद्रव्ये, पाणी, खते आदींची योग्य जोपासना केली आहे. लॉकडाउनमध्ये महाविद्यालय बंद असल्यामुळे तिकडचा वेळ त्याने आपल्या शेतीसाठी दिला. त्याने शेतात अपार कष्ट केल्यानंतर एकरी १०० टन उसाचे उत्पन्न घेतले आहे. वैभवकडून अनेक युवा शेतकऱ्यांनी आदर्श घेतला तर त्यांनादेखील याचा फायदा होऊ शकेल.

Leave a Comment