जागावाटपावरून शिंदे गट -भाजप मध्ये ठिणगी? नेमकं घडलं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 1 वर्ष बाकी आहे. मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 22 आणि विधानसभेला 126 जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कीर्तिकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुनंगटीवार म्हणाले, निवडणुकीला तर अजून एक वर्ष आहे. जागा वाटपाचा फार्मूला हा माईकवरून पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेल वरून कधीच ठरत नसतो . जागावाटपासाठी केंद्रात अमितभाई शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसतील. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर मात्र हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही असं म्हणत मुनगंटीवार यांनी कीर्तिकर यांच्यावर पलटवार केलाय.

कोणतंही राजकीय सूत्र हे तर्कसंगत ठरवावं लागतं. जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या जागा शिवसेनेने घेतल्याच पाहिजेत आणि भाजपाने त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. तसंच भाजपालाही त्यांच्या जागा मिळायला पाहिजेत. 2024 च्या निवडणुकीत दीनदुर्बल, सोशीत पीडित, अपंगाचा विकास करणारे, प्रगती करणारे सरकार आणण हे आपलं लक्ष्य असायला हवं, मंत्रालयाचा सहावा मजला हे आपलं लक्ष्य असता कामा नये असं म्हणत मुनगंटीवार यांनी सीए गटाचे कान टोचले.