युतीचा पूल बांधायचा असेल तर… ; युतीबाबत मुनगंटीवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत शिवसेना नेते, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत. तसे केल्याशिवाय शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, युतीचा पूल बनवायचा असेल तर दोन्ही बाजू योग्य असल्या पाहिजेत, शास्त्रीय दृष्टिकोनातून हा मनाचा पूल भविष्यात बांधला जाऊ शकत नाही. शिवसैनिकांना वाटत असेल एकत्र यावे पण आता आमच्यात इतके अंतर पडल की आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असे वाटत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार –

शिवसेना नेते तथा महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पुन्हा माध्यमाशी बोलताना युतीबाबत वक्तव्य केले. नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केले. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केले. मी कालही तेच विधान केले आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केला.