मोठी घडामोड!! मुलासाठी वडिलांची माघार; नाशिक पदवीधरसाठी सत्यजित तांबे रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य असलेल्या नाशिक पदवीधर (Nashik Graduates election) मतदारतसंघातील सस्पेन्स अखेर मिटला आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासाठी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असतील.

मी महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा (Congress) असलो तरी काही तांत्रिक कारणामुळे मला पक्षाचा एबी फॉर्म वेळेत मिळू शकला नाही. त्यामुळे मी काँग्रेस आणि अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच मी या निवडणुकीत उभा असेल. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांना पाठिंबा मागणार आहे. अगदी भाजप, दोन्ही शिवसेना आणि मनसे यांना सुद्धा मी पाठिंबा मागणार आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हंटल.

दरम्यान, डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली होती. आज सकाळापर्यंत तरी सुधीर तांबे हेच अर्ज भरणार असं वाटत होत. मात्र अचानकपणे सुधीर तांबे यांनी माघार घेत सत्यजित तांबे यांनी अर्ज भरला. त्यातही सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असल्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.