Thursday, February 2, 2023

जुन्या मोंढ्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | राहत्या घरी छताच्या बल्लीला साडीच्या साहाय्याने गळफास घेत एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शहरातील जुना मोंढा भागातील तक्षशिलानगरमध्ये समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. किशोर पॉटर्स नाडे वय-35 (रा. तक्षशिलानगर, जुना मोंढा, औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  किशोर हा एका दुकानात कामाला होता. घरी कोणीही नसताना त्याने साडीच्या साहाय्याने छताच्या लाकडी बल्लीला गळफास घेत आत्महत्या केली. नातेवाईक घरी आल्यावर ही बाब समोर आली.  मात्र किशोरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

- Advertisement -

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवलदार बी. के. नागरे हे करीत आहेत.