स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणाने भाड्याच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना एस. बी. कॉलनीतील बुधवारी दुपारी उघडकीस आली.

परमेश्वर बाबुराव चव्हाण (वय 27) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, परमेश्वर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. तयारी करण्यासाठी त्याने एस.बी. कॉलनीतील रूम भाड्याने घेतली होती. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परमेश्वरने रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा सर्व प्रकार सायंकाळी समोर आल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment