धक्कादायक ! घरगुती वादातून पाच लेकींसह आईची आत्महत्या

कोटा : वृत्तसंस्था – कोटा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरगुती वादातून एका महिलेने आपल्या पाच मुलींसह आत्महत्या केली आहे. कोणत्या तरी किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीमध्ये भांडणं होत असतात. मात्र ही भांडणं जर मिटली नाहीत, तर ती विकोपाला जाताना दिसतात. सततच्या भांडणाला वैतागून अनेकजण टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका आईने आपल्या पाच लेकींसह आत्महत्या केली आहे.

राजस्थानमधील कोटामध्ये शिवलाल आणि त्याची पत्नी बादाम देवी हे कुटुंबासोबत राहतात. या दांपत्याला एकूण 7 मुली होत्या. सर्वात मोठी मुलगी 13 वर्षांची तर सर्वात लहान मुलगी 1 वर्षाची होती. या दोघांमध्ये घरगुती कारणांवरून सतत भांडणं होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद व्हायचा. या सततच्या भांडणाला हे दोघे पती आणि पत्नी वैतागले होते.

हि घटना घडली तेव्हा पती शिवलाल घरी नव्हता. तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी पत्नी बादाम देवी यांनी आपल्या पाच लेकींसह आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या पाच मुलींसह विहिरीत उडी मारली. मात्र यामध्ये कोणालाच पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर हे सहाही मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. यादरम्यान 2 मुली घराबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.