Monday, January 30, 2023

धक्कादायक ! मुलाच्या मृत्यूने खचलेल्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

अंबाजोगाई : हॅलो महाराष्ट्र – अंबाजोगाईमध्ये एक हृद्रयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये एकुलत्या एक मुलाचा सात महिन्यांपूर्वी मेंदूविकाराने मृत्यू झाला होता. यामुळे खचून जाऊन या मुलाच्या वडिलांनी सासरवाडीत लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली आहे. हि घटना डिघोळअंबा या ठिकाणी बुधवारी दुपारी घडली. आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव कैलास यादवराव वरपे असे आहे.

साळेगाव येथील कैलास यादवराव वरपे यांच्या प्रशांत या १६ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मेंदूच्या आजाराने २२ नोव्हेंबर २०२० रोजी सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. तेव्हापासून मुलाच्या मृत्यूच्या विरहाने कैलास वरपे हे खचून गेले होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली आहे.कैलास वरपे यांनी बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास डिघोळअंबा या सासुरवाडीत मेव्हणे दगडू संभाजी मुळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक नानासाहेब धुमाळ, पोलीस नाईक कल्याण सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचे मेव्हणे दगडू संभाजी मुळे यांच्या जबाबावरुन युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.