Sukanya samriddhi yojana च्या व्याजाशी संबंधित ‘हा’ नियम जाणून घ्या !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली Sukanya samriddhi yojana ही केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांपैकी एक आहे. तसेच या योजनेत जमा केलेल्या रकमेवर सुरक्षिततेसह रिटर्न मिळण्याची सरकारी गॅरेंटी देखील आहे. याचबरोबर या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. याशिवाय या योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या व्याजावर देखील कोणताही टॅक्स देखील द्यावा लागत नाही.

Want To Open Sukanya Samriddhi Account? Here's How You Can Do It -  Goodreturns

Sukanya samriddhi yojana मध्ये गुंतवणूक करून पालकांना आपल्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च सहजपणे भागवता येईल. या योजनेची एक खास बाब अशी कि, यामध्ये कमीत कमी 250 रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे खाते उघडता येते. मात्र, यामधील वार्षिक ठेवीची मर्यादा 1.50 लाख रुपये असेल. 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे पालकांना हे खाते उघडता येईल. ही योजना 21 वर्षात मॅच्युर होते. तसेच हे खाते उघडल्यापासून फक्त 15 वर्षांपर्यंतच यामध्ये पैसे जमा करावे लागतात.

How to Open Sukanya Samruddhi Yojana Account - Online & Offline

सध्या Sukanya samriddhi yojana त वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते शेवटच्या तारखेदरम्यान उपलब्ध असलेल्या किमान शिल्लक रकमेवरच व्याज दिले जाईल. याचाहा अर्थ असा की, जर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी किंवा त्यापूर्वी पैसे जमा केले नाही तर त्या महिन्याचे व्याज मिळू शकणार नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, या योजनेचा हप्ता हा 5 तारखेपूर्वी जमा करावा जेणेकरून त्यावर व्याज मिळू शकेल.

answer to every question related to Sukanya Samriddhi Yojana faq interest  investment account deposit withdrawl rules and regulation - सुकन्‍या  समृद्धि योजना से जुड़े हर सवाल का यहां है जवाब

Sukanya samriddhi yojana मधील व्याज हे मासिक आधारावर मोजले जाते. मात्र संपूर्ण व्याज हे त्या त्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च रोजी जमा केले जाईल. हे व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ पद्धतीने वाढते. यामुळेच दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पैसे जमा करणे फायदेशीर ठरेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=89

हे पण वाचा :

Indian Railway कडून 120 गाड्या रद्द , अशा प्रकारे चेक करा लिस्ट !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा

महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ

PNB कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ !!!

Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!