अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी केला भांडाफोड, एका युवतीसह २ जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी । चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावात काल रात्री पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरु असलेल्या अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी भांडाफोड केला. धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या सर्व प्रकाराला संचालित करताना आढळल्याने या घटनेने रात्रभर गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून अधिक तपास सुरु आहे. जुनोना गावातील हिवरे यांच्या शेतातील घरी रात्री लगबग आढळून आल्याने गावातील काही नागरिकांना गडबड असल्याची शंका आली. या घटनेची शहानिशा करून गावातील नागरिकांनी अघोरी पूजेचा भांडाफोड केला. दरम्यान, घटनास्थळी एका युवतीसह २ जणांना गावकऱ्यांनी पकडलेव बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment