Friday, June 2, 2023

ज्ञानवापी मशिदीची सुनावणी जिल्हा न्यायालय करणार ; सुप्रीम कोर्टाकडून आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ज्ञानवापी मशिदी प्रकरणी हिंदु-मुस्लिम पक्षाकडून दावे केले जात असल्यामुळे याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार? एकादे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले आहे. तसेच आता जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्यात असून कोर्टाने महत्वाचा आदेश दिला आहे. 8 आठवड्यासाठी कोर्टाकडून देण्यात आलेला हा आदेश लागू राहणार आहे.

आज ज्ञानवापी मशिदी प्रकरणी अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कोर्टाकडून या प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडून सुनावणी घेण्याचा निर्णय देण्यात आला. तसेच आदेश जारी करताना कोर्टाने निरीक्षणात म्हंटले आहे की, जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश असतात ते अनुभवी असतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करणे योग्य ठरू शकत नाही.

परिणामी अनुभवी न्यायाधीशच खर्या अर्थाने या प्रकरणी न्याय निवडा करू शकतात, असे सुप्रीम कोर्टाकडून निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे.न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह तीन अनुभवी न्यायाधीशांनी अत्यंत महत्वाच्या अशा या मशिदी प्रकरणी सुनावणी केलेली आहे. त्यानंतर आता २३ मी रोजीच्या वाराणसी कोर्टाय काय सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.