Tuesday, February 7, 2023

मध्यप्रदेशात ‘कमल’ की ‘कमलनाथ’ उद्या होणार फैसला; विधानसभेत होणार बहुमत चाचणी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाविषयी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी सुनावणी केली. या दरम्यान, शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत फ्लोर टेस्ट घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या वतीने वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बहुमत चाचणी घेऊ नयेत अशी मागणी करत होते.

आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत हात वर करून मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संपूर्ण बहुमत चाचणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे सुद्धा या आदेशात म्हटलं गेलं आहे. यासह जर बंडखोर आमदारांना सभागृहात येण्यास कोणतीही भीती वाटत असेल तर मध्य प्रदेश आणि कर्नाटकच्या डीजीपींनी त्यांना सुरक्षा पुरवावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या भीतीचा सामना करावा लागू नये याची काळजी घ्यावी. असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. कालमानाथ यांच्या नैतृत्वातील काँग्रेसचे सरकार केवळ बहुमत गमावलेले सरकार नाही तर लोकांची फसवणूक करणारे दलालांचे सरकार आहे. बहुमत चाचणीमध्ये त्यांच्या पराभव निश्चित आहे असा दावा शिवराजसिंह चौहान यांनी केला.

त्याचवेळी विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह असून उद्या संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. त्याचवेळी भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. मध्य प्रदेशातील जनतेला नेहमीच भाजपाचे सरकार हवे असते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या ते पाहून वाईट वाटते अशी प्रतिक्रिया बाबुल सुप्रियो यांनी दिली

तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीतू पटवारी म्हणाले की, ”आम्ही बहुमत चाचणीठी सदैव तत्पर आहोत. खुद्द मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या संदर्भातील परिस्थिती स्पष्ट केली आहे. बंधक बनवलेल्या आमदारांना समोर आणण्याची गरज आहे. मध्य प्रदेश विधानसभा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास बांधील आहे आणि आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करू याचा आमहाला विश्वास आहे.”

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.