गोपीनाथ मुंडे मृत्यूप्रकरणात पारदर्शक चौकशीची गरज – सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे हॅकर सय्यद शुजा यांनी मुंडे यांना ईव्हीएम घोटाळ्याची माहिती होती आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. यामुळे देशभरात उलट -सुलट चर्चा रंगल्या असून मुंडे मृत्यूप्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तसेच भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणीही सुळे यांनी केली आहे

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला होता. परंतु शुजा या सायबर एक्सपर्टच्या दाव्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. “आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून ते आपण सादर करू शकतो” असा दावाही शुजा यांनी केला आहे. तेव्हा याबाबत पारदर्शक चौकशी होणे गरजेचे असल्याचे  मत सुळे यांनी व्यक्त केल आहे.

ईव्हीएमबाबत लोकशाहीला धक्का देणारा आरोप झाला आहे. याप्रकरणाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. निवडणुकांदरम्यान ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यात येतो. निवडणूक आयोगाकडे अनेक वर्षांपासून आम्ही ईव्हीएम बंदीची मागणी करत आहे. अनेक विकसित देशात बॅलेटवर मतदान होतं, मग आपणच का ईव्हीएमचा आग्रह धरतो? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

…तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होणार!

माढा उमेदवारीसाठी रोहित आणि पार्थ पवारांच्या नावांमुळे मोहिते-पाटील गट अस्वस्थ

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांचा युनिसेफकडून गौरव

Leave a Comment