साताऱ्याचे सुपुत्र सुरज शेळके लष्कराच्या ऑपरेशन रक्षकमध्ये शहिद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जम्मू -काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे. लष्कराचं ऑपरेशन रक्षक सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले आहेत. सुरज शेळके हे साताऱ्यातील खटाव गावचे सुपूत्र आहेत. लेहमध्ये जवान सुरज शेळके यांच्या जाण्यानं खटावमध्ये शोककळा पसरली आहे.

शहीद जवान सुरज प्रताप शेळके हे सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्यातील खटाव तालुक्यातील रहिवासी आहेत. तीनच वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षकदरम्यान वयाच्या 23व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्या जाण्यानं खटावसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.

तत्पूर्वी, याच महिन्यात 11 जून रोजी वडूज तालुक्यातील भुरकवडीचे सुपुत्र जवान संग्राम फडतरे जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये शहीद झाले होते. तत्पूर्वी 27 मे रोजी खटामधीलच विसापूर गावचे सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण आलं होतं. त्यानंतर आता सुरज शेळके याच्या जाण्यानं खटावसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment