म्हणून धोनी आणि मी १५ ऑगस्टलाचं घेतली निवृत्ती; सुरेश रैनानं केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई । भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियात फिनिशरची चोख कामगीरी बजावणारा सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी दोघांनी एकापाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली. पहिल्यांदा धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ सुरेश रैनानेही इन्स्टाग्रामवरुन धोनीला शुभेच्छा देत मी देखील तुझ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे असं म्हणतं निवृत्ती स्विकारली.

दरम्यान, या धोनी आणि रैनाने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यासाठी १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनाचीचं का तारीख निवडली यावरून सोशल मीडियावर तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण आलंय. अशा वेळी खुद्द सुरेश रैनानं दैनिक जागरणशी बोलताना १५ ऑगस्ट रोजीच निवृत्ती का घेतली, याचं उत्तर दिलं आहे.

सुरेश रैनाने दैनिक जागरणला संगितले कि, ‘आम्ही दोघांनी आधीपासूनच शनिवारी निवृत्ती घेण्याचं ठरवलं होतं. धोनीच्या जर्सी क्रमांक ७ आहे आणि माझ्या जर्सीचा क्रमांक ३ आहे. दोन्ही मिळून ७३ होतात. शनिवारी भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी या दिवसाची निवड केली.’ निवृत्तीसाठी १५ ऑगस्टचीच निवड का केली, असं सांगत रैनाने सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

‘२३ डिसेंबर २००४ रोजी धोनीनं बांगलादेश विरोधात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. तर मी ३० जुलै २००५ रोजी श्रीलंका विरोधात दांबुला येथा पदार्पण केलं होतं. आम्ही दोघेही १५-१६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. दोघांनाही जवळपास एकाचवेळी पदार्पणही केलं होतं. तसेच चेन्नईच्या संघातही आम्ही दोघे सोबत होतो. आणि यापुढेही आयपीएलमध्ये एकत्रच खेळत राहू’ असंही रैना पुढे म्हणाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment