अभिमानास्पद!! 16 हजार फुट उंचीवर जवानाची शस्रक्रिया !

लष्करातील डॉक्टरांचं अनोख धाडस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्मीमध्ये डॉक्टरांनाही खूप महत्व असत. मात्र या डॉक्टर्सच्या कहाण्या फारश्या बाहेर येत नाही. आर्मीमधील अशाच काही डॉक्टरांनी तब्बल 16 हजरा फुटांवर जात एका जवानाचे प्राण वाचवले आहेत. लेह मधल्या एका पोस्टवर तैनात असलेल्या या जवानाला अपेंडिक्सचा खूप त्रास होत होता. या डॉक्टरांनी त्याचं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ऑपरेशन करून या डॉक्टरांनी खरंच एक इतिहास घडवला आहे.

दरम्यान कामावर तैनात असलेल्या जवानाला अचानक अपेंडिक्सचा त्रास सुरू झाला. त्याला असह्य वेदना होत असतानाही प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला चॉपरच्या साह्याने हॉस्पिटमध्ये आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे शेवटी डॉक्टरांनीच उंचावर पोस्टजवळ जात ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

एवढ्या उंचावर ऑपरेशन करणं धोक्याचं होतं. मात्र जवानाचे प्राण वाचवणंही आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी सगळा धोका पत्करत तिथे जात यशस्वी ऑपरेशन केलं आणि जवानाचे प्राण वाचवले. अतिशय कडाक्याची थंडी या भागात असते. ऑक्सिजनची कमरताही असते. त्यामुळे डॉक्टरांच्या या धाडसाला सलाम केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like