दुर्मिळ! धुळ्यामध्ये गायीने दिला चक्क ४ वासरांना जन्म; बघ्यांची होतेय एकच गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे । आजवर तुम्ही गाईला एक किंवा दोन बछडे झाले असल्याचे बघितले असेल किंवा ऐकले असेल. परंतु एका गाईने चक्क ४ वासरांना जन्म दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात सर्वांना चकित करणारी आश्चर्यकारक घटना घडली आहे. जन्मदाती गाय आणि तिचे चारही वासरं सुखरुप आहेत. या गाईला आणि तिच्या चारही वासरांना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे.

पिंपळनेर येथील गाईचे व्यापारी सतीश निकम यांचा गेल्या 10 ते 12 वर्षांपासूनचा जनावरे विकण्याचा व्यवसाय आहे. सतीश निकम या व्यापाऱ्याने नेहमीप्रमाणेच विक्रीसाठी आणलेली गाय बाजारामध्ये विकण्यासाठी नेली असता बाजारामध्ये गाईने चार बछड्यांना जन्म दिला. संबंधित व्यापाऱ्याने तात्काळ गाईला आणि बछड्यांना न विकता आपल्या घरी आणले.

त्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांची तपासणी करण्यास सांगितले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गाय आणि बछडे सुरक्षित असल्याचं सांगितल आहे. ४ बछड्यांना जन्म देणारी गाय ही आपणास लाभदायक असल्याचे म्हणत व्यापाऱ्याने त्या गाईला आता न विकण्याचा निर्णय घेत तिचे आणि तिच्या 4 बछड्यांचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्मिळ घटनेची चर्चा सध्या संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये सुरु असून या गाईला आणि बछड्यांना बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment