आश्चर्यचकीत विद्युत पुरवठा नसतानाही शेतकऱ्याला पाठवले 21 हजारांचे वीजबिल

माजलगाव : वैजापूर तालुक्यातील जातेगांव टेंभी शिवारातील राहणाऱ्या शेतकऱ्याला 21 हजार 90 रुपयाचे विजबिल पाठवल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. क्र 19 मध्ये विहरीसाठी विद्युत पुरवठा मिळालेला नसतानाही भरमसाठ विजबिल पाठवले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांसाह ग्रामस्थही आश्यर्यचकित झाले आहेत.

जातेगांव टेंभी येथील लताबाई दिगंबर मलिक यांची गट क्रमांक -19 मध्ये शेती आहे. त्यासाठी विहरीच्या विद्युत मोटारीसाठी विद्युत पुरवठा हवा होता. त्यासाठी त्यांनी 26 ऑगस्ट 2016 रोजी 6300 रुपये कोटेशन भरून रीतसर विद्युत पुरवठ्यासाठी अर्ज केला होता. मात्र आतापर्यन्त महावितरण कंपनीने त्यांच्या विहरीवर विद्युत पुरवठा दिलेला नाही. तसेच मीटर बसवण्यात आले नाही.

मात्र महावितरणाच्या गोंधळी कारभारामुळे संबंधीत शेतकऱ्याला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण, या शेतकऱ्याला महावितरनाने 11 मे 2019 रोजी 1416 युनिट वापराचे 21090 रुपयांचे विजबिल पाठवले होते. विहरीपर्यंत वीज जोडलेली नसतानाही हे बिल आलेच कसे असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. यां बाबत दखल घेऊन वीज देयकाची दुरुस्ती करावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

You might also like