Surya Grahan 2022 : भारतात दिसणार का हे सुर्यग्रहण; जाणुन घ्या कधी अन् कुठून दिसणार, काय होणार परिणाम?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एप्रिलच्या शेवटच्या दिवशी या वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण (Surya Grahan 2022) होणार आहे. यावेळी हे सूर्यग्रहण चार तासांपेक्षा जास्त वेळ चालेल. या ग्रहण काळात सूर्याचा सुमारे 65 टक्के भाग चंद्राने व्यापला जाईल, असा दावा नासाने केला आहे. 30 एप्रिल रोजी दुपारी 12:15 वाजता सुरू होणारे हे सूर्यग्रहण दुसऱ्या दिवशी 1 मे 2022 रोजी पहाटे 04:07 वाजता संपेल.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, 30 एप्रिल रोजी सुरु होणारे हे आंशिक सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण आणि नैऋत्य भाग, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिकाच्या बहुतांश भागातून पाहता येणार आहे. एमपी बिर्ला प्लॅनेटेरियमचे माजी संचालक म्हणाले, “अर्जेंटिना, उरुग्वे, चिली, बोलिव्हिया किंवा अंटार्क्टिकामधील लोकंही याला पाहू शकतील. हे सूर्यग्रहण नेहमी एका ठिकाणाहून सुरू होऊन दुसऱ्या ठिकाणी संपते. पृथ्वीच्या फिरण्यामुळे असे घडते.” Surya Grahan 2022

हे ग्रहण संपूर्णपणे किंवा आंशिक टप्प्यात युरोप तसेच आशियाचा दक्षिण-पश्चिम भागांमध्येही पाहता येईल. तसेच ते उत्तर अमेरिकेचा मोठा भाग, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर प्रदेश आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांमध्येही पाहता येईल.

सार्वत्रिक वेळेनुसार सकाळी 6.45 वाजता हे आंशिक सूर्यग्रहण सुरू होईल, जे भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 मे, 00:15 वाजता असेल. भारतासाठी ते 1 मे रोजी दुपारी 2.11 सुरु होऊन 4.07 वाजता संपेल. यावेळी भारतात रात्रीची वेळ असल्याने ते पाहता येणार नाही.

मात्र 16 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी परिस्थिती उलट असेल, कारण ते दिवसा होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सकाळी 7.02 वाजता सुरू होईल. मात्र पूर्ण ग्रहण हे सकाळी 7.57 च्या सुमारास सुरू होईल. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात खोल भागात असेल तेव्हा जास्त ग्रहण दिसेल. हे सकाळी 9.41 च्या सुमारास होईल आणि हे पूर्ण ग्रहण रात्री 10.23 वाजता संपेल. या ग्रहणाचा आंशिक टप्पा सकाळी 11.25 वाजता संपेल.

हे सूर्यग्रहण भारतात कसे पाहता येईल? Surya Grahan 2022

भारतातील ज्या लोकांना हे ग्रहण पाहण्याची इच्छा आहे ते नासाच्या यूट्यूबवर लाईव्ह पाहू शकतात.