रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ ; तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामिन अर्ज सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला असून तिच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रियाच्या कोठडीतील मुक्कामात वाढ झाली आहे.

रियासह शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत देखील  वाढ करण्यात आली आहे. रिया आणि शौविकला एसीबीने ड्रग्स प्रकरणामध्ये अटक केली आहे. रिया आणि शौविक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

रिया आणि शौविकने अनेक वेळा  न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. मात्र प्रत्येक वेळा कोर्टाने त्यांची जामिन अर्ज फोटाळला आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like