सुशांतसिंह राजपूत केस : रिया वापरायची सुशांतचं Debit आणि Credit कार्ड

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांना दरदिवशी नवनवीन माहिती मिळत आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या आहे असं सिद्ध करणारा कोणताही पुरावा किंवा साक्षीदार सापडला नाही. शुक्रवारी या केसमध्ये एक नवीन खुलासा झाला. पोलिसांना सुशांतचे बँक डिटेल मिळाले. ज्यात रिया त्याच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करायची असं समोर आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी चौकशीचा एक भाग म्हणून सुशांतचे गेल्या ११ महिन्यांचे सर्व बँक अकाउंटचे स्टेटमेन्ट पाहिले. यात स्पष्ट झालं की सुशांतच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर रिया तिच्या शॉपिंगसाठीही करायची. यासोबतच गेल्यावर्षी दोघं युरोप टूरला गेले होते. तिथला रियाचा संपूर्ण खर्च सुशांतनेच केला होता. एवढंच नाही तर रियाला सुशांतच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा पिन कोड आणि पासवर्ड माहीत होता. रिया सुशांतचे कार्ड स्वतःसोबत घेऊन फिरायची आणि अनेक दिवस त्याचे कार्ड तिच्याकडेच असायचे.

सुशांतच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत ३५ लोकांहून अधिकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यासोबतच पोलीस सुशांतच्या मीडिया अकाउंटचीही तपासणी करत आहेत. पण यात अजूनपर्यंत ठोस असा कोणताही पुरावा मिळाला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.