शिंदे गटाच्या ‘त्या’ चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांच षडयंत्र; अंधारेंचा धक्कादायक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर हिवाकी अधिवेशनात विधान परिषदेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर विधान परिषदेत गोंधळ उडाल्यामुळे अधिवेशन तहकूब करण्यात आले. यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला.

फडणवीसांच्या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस फार अभ्यासू नेते आहेत. त्यांच्याकडून मला फार अभ्यासू उत्तराची अपेक्षा आहे. मात्र, सभागृहात मूळ प्रश्न कोणता आहे की, 83 कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला? आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे तब्बल चार मंत्री अडचणीत आले आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटातील आहे. म्हणजे टीम भाजप पद्धतशीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दहा-पंधरा दिवसांपूर्वी म्हणाले होते की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बसवायचं आहे. ते पद्धतशीरपणे कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे.एकीकडे चर्चेची राळ उडवाची आणि तिकडे षडयंत्र आखायचं ही देवेंद्र फडणवीस यांची नीती कौतुकास्पद असल्याचे अंधारे याणी म्हंटले.