गेंड्याच्या शिकारीचा प्लॅन आला अंगलट, हत्तीच्या पायाखाली सापडल्याने गमावला जीव !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी दक्षिण आफ्रिकेमधील क्रूगर नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये गेंड्याच्या शिकारीसाठी आलेल्या तीन जणांपैकी एकाचा हत्तीच्या पायाखाली येऊन मृत्यू झाला.क्रूगर नॅशनलपार्क हे गेंडे, हत्ती, सिंह, बिबटे आणि म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. या पार्कच्या फाबेनी भागात शनिवारी वनसंरक्षकांना ३ लोक दिसून आले होते. ते तिघेजण गेंड्यांच्या शिकारीसाठी आल्याचा संशय वनसंरक्षकांना आला होता. वनसंरक्षकांच्या नजरेत पडताच त्या तिघांनी तिकडून पळ काढला. त्यानंतर ते तिघेजण वनसंरक्षकांच्या नजरेतून लपण्यासाठी हत्तींच्या कळपात शिरले. त्या कळपामध्ये मोठे हत्ती आणि त्यांची पिल्लेदेखील होती. अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

३ जणांपैकी एकला वनरक्षकांनी अटक केली. तर आपला एक साथीदार मरण पावला असल्याची शक्यता त्याने पोलिसांना सांगितली. त्यानंतर वनसंरक्षक त्याला घेऊन ते तिघे ज्या मार्गावरून गेले होते, त्या मार्गावर जाऊन त्यांनी दुसऱ्या साथीदाराचा शोध घेतला. तेव्हा त्यांना हत्तींनी पायदळी तुडवल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यांचा अजून एक साथीदार तिकडून पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या त्याचा शोध सुरु आहे.

त्या शिकाऱ्यांकडून एक रायफल, कुऱ्हाडी ठेवलेली एक बॅग आणि इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. यावरून ते गेंड्यांची शिकार करण्यास आले असल्याचे स्पष्ट झाले. क्रूगर नॅशनल पार्कचे व्यवस्थापकीय अधिकारी गॅरेथ कोलमन यांनी ‘ नॅशनल पार्कमध्ये घडलेला मृत्यू दुर्दैवी आहे; मात्र क्रूगर नॅशनल पार्कमधल्या गेंड्यांची शिकार केवळ टीमवर्क आणि शिस्तबद्धतेतूनच थांबवता येऊ शकते. शिकारीमुळे, तस्करीमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होतात. तसंच ज्या साधनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि विकास होऊ शकतो, तेच दावणीला बांधले जातात,’ असे आपल्या निवेदनात म्हंटले आहे.

Leave a Comment