रायगड समुद्रकिनारी संशयास्पद बोट; 3 AK 47 रायफल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील रायगड येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर दोन संशयास्पद बोटी सापडल्या आहेत. या बोटीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एटीएस प्रमुख विनित अग्रवाल हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत

आज सकाळी आठच्या सुमारास ही बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिकांनी बोटीत काय आहे याबाबत पाहणी केली असता त्यांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या बोटीतून 3 AK 47 (AK 47), 3 रायफल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे.

दरम्यान, हि बोट संशयास्पद नसून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही असं आवाहन पोलिसांनी केलं आहे . पोलीस चौकशीत हि बोट ओमान सिक्युरिटीची असल्याचे समोर आले आहे. रायफल वर ज्या कंपनीचे नाव आहे त्या नेपच्यून मेरीटाइम शी सुरक्षा यंत्रणा संपर्कात आहेत. मात्र तरीही पोलीस यंत्रणा सतर्क असून संपूर्ण राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.