दूध दरवाढ मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २१ जुलैला राजव्यापी आंदोलन

कोल्हापूर । दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव पाहता सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

‘आम्ही कोणालाही जबरदस्ती करत नाही पण आम्हाला आमचं दूध विकायचं नाही आणि दूध संकलन करायचं नाही अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी सहकार्य करावं. दूध संघांनी देखील दूध संकलन बंद करावी आणि आंदोलनाला सहकार्य करावं’ असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

दूधावरील GST कर मागे घ्यावा, याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ रूपये अनुदान द्यावं, निर्यात अनुदान ३० रूपये द्यावं इत्यादी मागण्यासह हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यात इतरत्र १८ ते २० रुपये लीटरने दूध खरेदी केलं जातं असल्यामुळे स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”