स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले जात होते. दरम्यान आज तुपकर यांची तब्बेत जास्त खालावल्याने त्यांची राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तुपकरांनी आपले आंदोलन आज स्थगित केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनानंतर आज चौथ्या दिवशी त्यांची तब्बेत जास्त खालावल्याने सकाळी वैद्यकीय पथकाकडून त्यांची आज तपासणी करण्यात आली. त्यांना आज रात्रीपर्यंत रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. दरम्यान त्याची मंत्री शिगणे यांनी भेट घेत मागण्यांबाबत चरचा केली. डॉ. शिंगणे यांच्याची झालेल्या चर्चेनंतर तुपकरांनी पाणी पिऊन आपले आंदोलन स्थगित केले.

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन आहे. ठिक-ठिकाणी रास्तारोको झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील अनेक महामार्गावर आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर त्यांनी नागपुरात आंदोलन सुरू केले होते. बुधवारी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली होती.