स्वच्छ सर्वेक्षण 2022 : पाचगणी नगरपरिषद देशात अव्वल, राष्ट्रपतीच्या हस्ते 1 ऑक्टोबरला गाैरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये पाचगणी गिरीस्थान पालिकेने अव्वल स्थान पटकावले असून पालिकेची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झालीं आहे. या पुरस्काराचे वितरण
दि. 1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेचा द्वितीय तर पाचगणी पालिकेचा तृतीय क्रमांक देशातून आला आहे.

शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी, पालिका कर्मचार्‍यांनी झोकून केलेले काम, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपरिषद अव्वल स्थानावर पोहोचली आहे. शहरातील सौंदर्यीकरणसाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्‍याचे योग्य नियोजन या बाबी स्पर्धेत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. या स्पर्धेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर, आरोग्य अभियंता, आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी झोकून देवून काम केल्याने तसेच पाचगणीतील नागरिकांचा सहभाग यामुळे देशात पाचगणी नगरपरिषद अग्रक्रमाने स्पर्धेत अव्वल राहिली आहे. एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पाचगणी पालिकेला सलग दोन पुरस्कार

या अगोदर केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा नॅशनल टुरिझम अवॉर्ड 2022 पाचगणी गिरीस्थान पालिकेला नुकताच जाहीर झाला असून 27 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे. सलग दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेचे कौतुक होत आहे. पाचगणी पालिकेला मिळालेले दिन पुरस्कार हा सर्व पांचगणीकरांचा अभिमान आहे. नागरिकांचा सहभाग तसेच माजी पदाधिकारी, व न. पा. चे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्य यामुळे शक्य झाले आहे, असे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले.