हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या जगात आर्थिक नियोजन करणे गरजेचं आहे. खास करून उत्तर वयात आपल्याकडे काहीतरी आर्थिक शिल्लक असावी आणि आणि आपले उर्वरित जीवन आनंदी आणि आरामदायी जावे यासाठी पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि नियोजन आवश्यक असते. आज आम्ही तुमच्या अशा एका योजनेबाबत सांगणार आहोत ज्यामध्यमातून तुम्ही तुमच्या उतार वयात चांगली रक्कम मिळवू शकता. या योजनेचं नाव आहे SWP म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन, जर तुम्ही योग्य नियोजन केल्यास या योजनेच्या माध्यमातून दरमहा ३५ हजार रुपये मिळू शकतात.
5 हजार रुपये प्रति महिना गुंतवणूक
SWP म्हणजेच सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅनमध्ये तुम्ही दरमहा रु 5,000 ची गुंतवणूक सुरू केल्यावर सुमारे 20 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन म्हणून दरमहा 35 हजार रुपये मिळू लागतील. सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) ची खासियत म्हणजे यामध्ये गुंतवणूकदार स्वतः ठरवतो की त्याला किती वेळेत पैसे काढायचे आहेत. योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही किंवा वार्षिक आधारावर पैसे काढण्याची तरतूद आहे.
SWP म्हणजे काय?
SWP ही पद्धतशीर पैसे काढण्याची योजना आहे, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात नियमित पैसे काढता येतात. याद्वारे, योजनेतून युनिट्सची पूर्तता होते. ठराविक वेळेनंतर यामध्ये अतिरिक्त पैसे असतील तर ते तुम्हाला मिळतात. येथे होल्डिंग कालावधी 12 महिन्यांपेक्षा जास्त नसेल पण गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. तसेच, यामध्ये परतावा मिळण्याची हमी एसआयपीपेक्षा जास्त आहे. पण लोकांचा कल हा SIP कडे अधिक आहे.
खाली SWP आणि SIP योजनेतील गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा परतावा ह्या बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
SIP योजना
मासिक एसआयपी रु 5000
मुदत 20 वर्षे
अंदाजे परतावा 12%
50 लाखांची निव्वळ किंमत
SWP योजना
फक्त 5000 रुपये मासिक योजना, 35 हजार रुपये पेन्शन दरमहा देणार
साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पैसे काढण्याची तरतूद