महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिसून आली कोरोनाची लक्षणे, ड्रायव्हरसह चार जणांना लागण झाल्याचा दावा

मुंबई । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. पवार यांच्या ड्रायव्हरसह चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. खरे तर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी दिवाळीच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या दिवाळी शुभेच्छा स्वीकारल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदा या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर होते.

त्यांना याबद्दल विचारले असता, राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणाले की,”अजित पवार यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सूचित केले आहे. आज सकाळी त्यांची तपासणी करण्यात आली असून रिपोर्ट्स येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. खबरदारी म्हणून आम्ही कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला.”

‘सरकार कोरोनाबाबत चांगले काम करत आहे ‘ – पवार
दुसरीकडे, शरद पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करताना म्हटले की,” त्यांनी घेतलेल्या “काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे” कोविड-19 प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत झाली. परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि महामारीमुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले,”यावर्षीही नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करावी की नाही याबाबत कुटुंबात संभ्रम होता, मात्र लोकांनी आणि सहकाऱ्यांनी बारामतीतच दिवाळी साजरी करण्याचा आग्रह धरला आणि सर्व कोविड-19 प्रोटोकॉल पाळणार असल्याची ग्वाही दिली. ” आज शेकडो लोकं आणि कार्यकर्त्यांनी येऊन शिस्तबद्ध पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की,” कोरोना विषाणूची परिस्थिती आणखी सुधारेल असा विश्वास आहे. “आम्ही धोक्यातून बाहेर येत आहोत… मला खात्री आहे की, आपण पुन्हा सामान्य स्थितीत येऊ आणि महामारीच्या काळात झालेले नुकसान भरून काढू आणि अर्थव्यवस्था पूर्ववत करू शकू,” पवार पुढे म्हणाले की,” मला खात्री आहे की आपण प्रत्येकजण पुन्हा नव्या आशेने सुरुवात करू शकू.”

You might also like