जावली प्रतिनिधी | सादिक सय्यद
गणेशोत्सव 2021 या सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी 50 जणांना तडीपार केले होते. त्यानंतर आता मेढा पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांसह तब्बल 40 जणांना तडीपार करण्यात आले आहे. मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल माने यांनी याबाबतचे प्रस्ताव तयार करून जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे पाठवला असता त्यांनी कारवाई केली. त्यामुळे कारवाई झालेल्या संशयितांना 10 दिवस जावली तालुक्यात राहता येणार नाही.
उपविभागीय दंडाधिकारी यांनी तात्पुरत्या तडीपारी बाबत प्रवेश प्रतिबंध मनाई हा महत्वपूर्ण आदेश देत 40 जणांना 10 दिवसांसाठी तडीपार केले. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर गुन्हेगार क्षेत्रात खळबळ उडाली. तडीपारीचे आदेश झाल्यानंतर मेढा पोलिसांचा प्रतिबंधात्मक विभाग ऑर्डर बजावण्यासाठी तयार झाले. तात्पुरत्या तडीपारीमध्ये – दिपक शामराव वरागडे, प्रवीण रामचंद्र वरगडे, जितेंद्र श्रीरंग रोकडे (रा. कुडाळ, ता. जावली), मंगेश भारत निकम उर्फ मंगेश रामचंद्र निकम (रा. करंदी तर्फ कुडाळ), सिकंदर हमीद पठाण, तन्वीर हमीद पठाण, अस्लम जमाल पठाण (रा. जवळवाडी मेढा), मुबारक इस्माईल शेख (रा. हुमगाव), संजय नारायण बेलोशे (रा. केळघर), वामन लक्ष्मण आढाव (रा. धोंडेवाडी), हिंमत किसन विधाते (रा. सोनगाव), तुकाराम राजाराम चौधरी, हरिभाऊ सहदेव चौधरी, प्रमोद बाळू चोरट, सचिन नरहरी चौधरी, जगन्नाथ नारायण चौधरी, विजय सहदेव चौधरी, ऋषिकेश उर्फ गणेश दत्तात्रय सणस, रमेश बाजीराव चौधरी, गणेश ज्ञानदेव चौधरी, अक्षय राजाराम पाकीरे, संदीप रामचंद्र सणस, दत्तात्रय रामचंद्र सणस, बाळू मारुती चोरट, लक्ष्मण गणपत सणस, सदाशिव मारूती चौधरी, आनंदा दगडू दुधाने, प्रथमेश कृष्णा चौधरी, मंगेश सुभाष चौधरी, सुभाष जगू चौधरी, रोहित ज्ञानेश्वर हगवणे, गणेश ज्ञानेश्वर हगवणे, तुषार बाळकृष्ण चौधरी, अक्षय राजेंद्र चौधरी, लहू मधुकर चौधरी, सदाशिव आप्पा चौधरी, सुरेश बबन चौधरी, (रा. पानस- पुनर्वसन ता. जावली, जि. सातारा) या संशयितांचा समावेश आहे.
तडीपार केलेल्या संशयितांना आज ता.10 सप्टेंबर पासून ते ता. 19 सप्टेंबर गणेश विसर्जन होईपर्यंत मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास / प्रवेश करण्यास बंदी प्रतिबंध राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी देखील तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे सदर संशईत लोक संपूर्ण जावली तालुक्यात फिरताना दिसल्यानंतर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.