सातारा पोलिसांकडून पळून जाणाऱ्या तडीपार गुंडांस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय देवराम राठोड (वय-30  वर्षे रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबाजार, सातारा) यास अटक करण्यात आली. अजय राठोड याला दरोडा, जबरी चोरी, दारू विक्री करणारा गुन्हेगार असल्याने त्यास पोलीस अधिक्षक अजय बन्संल, सातारा यांनी वर्षासाठी सातारा जिल्हयातून तडीपार केले होते.

सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा तडीपार गुंड हा सातारा परिसरामध्ये छुप्या पध्दतीने फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने लागलीच त्यास पकडण्याबाबत महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी डी. बी. पथकामार्फत सातारा शहर परिसरामध्ये शोध मोहिम घेवून सदर तडीपार गुंडाचे राहण्याचे ठावठिकाण्याची माहिती घेतली. त्यास पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना डी. बी. पथकातील पोलीस स्टाफने त्यास शिताफीने ताब्यात घेवून. तडीपार आदेशाचे उल्लंघन केलेप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. फौजदार व्ही. व्ही. पवार हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना.सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, विक्रम माने, अभय साबळे, पो.कॉ.संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, गणेश घाडगे यांनी केलेली आहे

Leave a Comment