मुंबईला पळून जाणाऱ्या तडीपार गुडांना सातारा बसस्थानकातून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत आहेत. याबाबत शाहुपुरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तडीपार चोरट्याच्या घरी जावून तपासणी केली. तेव्हा पोलिसांना पाहून झोपडपट्टीतील गुंड पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर या प्रकरणातील गुंड मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून 4 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झोपडपट्टीतील तडीपार आरोपींनी मोटार सायकल चोरी केल्याची माहीती शाहुपुरी पोलिसांना मिळाली होती. संशयित विकास मुरलीधर मुळे आणि ऋत्विक धनंजय पंडित या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दोघानांही सातारा एसटी स्टँड परिसरात पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर तडीपार कारवाईचे भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 15 दिवसांपूर्वी सातारा शहरातून 4 मोटरसायकल चोरी केलेल्या होत्या. त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत.

सदरचे चोरटे हे मोटरसायकल निव्वळ हौसेने फिरवण्यासाठी चोरी करत असल्याचे त्यानी पोलिसांना सांगितले असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी शाहूपुरी पोलिसांना मोटरसायकल चोरीतील सराईत आरोपींची माहिती संकलित करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचनात केल्या होत्या. नंतर शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस आरोपींची माहिती घेत मोटार सायकल चोरावर कारवाई केली आहे.