तडीपार : सातारा जिल्ह्यातून 2 टोळ्यातील 13 जणांवर एसपींची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कराड शहरासह परिसरात खूनासह गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या 10 तर मेढा परिसरातील 3 असे बेकायदा दारु विक्री, जुगार चालवणाऱ्या दोन टोळीतील 13 जणांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल दिली आहे. कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, पोलिस हवालदार श्री. येळवे. पोलिस काॅन्सटेबल गाडे, पोलिस नाईक संजय जाधव यांनी प्रस्ताव सादर केला होता. तर मेढा पोलिस ठाण्याचे अमोल माने यांनी हद्दपारीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार 13 जणांवर कारवाई करण्यात आली.

कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सोमनाथ उर्फ सोम्या अधिकराव सुर्यवंशी (वय- 30), जमीर मलिक फकीर शेख (वय- 26), तुषार प्रकाश सुर्यवंशी (वय- 25), सागर सुभाष सुर्यवंशी (वय – 20), आकाश उर्फ डाबर सर्जेराव पळसे (वय- 22), रविराज शिवाजी पळसे (वय- 22), जयदीप सुभाष कोरडे (वय- 33), दत्तात्रय तानाजी कोरडे (वय- 35), ओंकार उर्फ सोन्या बाबासो सुर्यवंशी (वय -20), अनिकेत सुनील खरात (वय- 26, सर्व रा. हजारमाची, ओगलेवाडी ता.कराड) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना सहा महिन्यासाठी सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून तडीपार करण्यात आले आहे.

या टोळीवर कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न, दुखापत करुन शिवीगाळ व दमदाटी करणे, खून, गर्दी, मारामारी, बंदुका बाळगणे जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीला सहा महिन्यांसाठी संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव वाळवा शिराळा या तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे.

मेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दिपक शामराव वारागडे (वय- 46), प्रवीण रामचंद्र वारागडे (वय- 45), जितेंद्र श्रीरंग रोकडे (वय- 48, सर्व रा. कुडाळ, ता. जावली) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या टोळी विरुध्द मेढा पोलिस ठाण्यात चोरटी दारु विक्री, मटका व जुगार चालवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या टोळीला सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या प्राधिकरणासमोर, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोनि किशोर धुमाळ, पोनि बी. आर. पाटील, सपोनि विजय गोडसे, सपोनि अमोल माने, पोलिस हवालदार मधुकर गुरव, प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी संशयित आरोपीविरुध्द पुरावा सादर करून कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment