अमित शहांना सहकारमंत्री करून मोदींनी साधला डाव; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने काल मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवहारांची पारदर्शकता वाढावी तसेच सहकार क्षेत्र आणखी सक्षम व्हावे यासाठी अमित शहा यांना सहकार मंत्री … Read more

देवघरात चक्क शरद पवारांचा फोटो! ‘हे’ पाहून पवारही झाले भावूक

पुणे । माजी आमदार विलास लांडे यांच्या वडिलांचे ३० जून रोजी निधन झाले. वारकरी आणि पैलवान अशी ओळख असणाऱ्या दिवंगत विठोबा लांडे यांना माजी कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विठोबा लांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते शरद पवार यांचे सहकारी होत. यावेळी … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात … Read more

राज्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूरचे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या टर्ममध्ये मी चार वर्षे मंत्री म्हणून होतो त्याचा अनुभव पाठीशी असल्याने आता गृहराज्यमंत्री म्हणून काम करणं अधिक सोपं होणार आहे.

पाठिंबा देण्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला आहे. काल शिवसेनेला सत्तास्थापनेचे पत्र काँग्रेस-राष्ट्रवादीने वेळेत दिले नसल्याने सेना सत्ताखेळात तोंडघशी पडली होती. दरम्यान राज्यपाल कोशियारी यांनी राष्ट्रवादीला आता सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र आता सत्तास्थापन पाठिंब्याच्या पत्रावरून काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, जनसुराज्य खाते उघडणार? ‘भाजपा-सेने’साठी धोक्याची घंटा !

विधानसभेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वही १० जागांसाठी अत्यंत अटीतटीचे सामने आहेत. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असताना हळूहळू कल स्पष्ट होऊ लागला आहे. त्यानुसार आठ जागा लढविणारी शिवसेना जिल्ह्यात ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे तसेच दोनच जागा लढविणाऱ्या मित्रपक्ष ‘भाजपा’च्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात कोरी पाटी राहिलेल्या काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाने यावेळी खाते उघडण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावून टक्कर देण्याचे ठरवले आहे. यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांनी लक्षवेधी हवा निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकत अब्रू राखणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यंदा पूर्णपणे ताकद लावली आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्रातील इंच-इंच जमीन ही सिंचनाखाली आली असती , ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी मोडून पडला हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केला.

अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहे

सांगली जिल्ह्यातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळली आहे,यामुळे या ‘नेत्यांनी’ संभाजी महाराजांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या आडून राष्ट्रवादीची टोळी जातीयवाद करीत आहेत असा आरोप भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.