शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच! किरीट सोमय्या यांची सरकारवर ट्विटरद्वारे टीका

राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर ट्विटरद्वारे जहरी टीका केली आहे.

‘त्या’ कागदपत्रांवर रितेश देशमुखने केला ट्विटर द्वारे खुलासा

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचे काही कागदपत्रे सोशल मिडीया वर चांगलेच व्हायरल झाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या मधूपूर्णिमा किश्वर यांनी कागदपत्रांचे फोटो शेअर करत ”चुकीच्या पद्धतीने ४ कोटी ७० लाख रुपयांचं कर्ज माफ करून घेतले असल्या”चे त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे सगळीकडे हा मोठा चर्चेचा विषय बनला होता. मात्र आता स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांना याबाबत खुलासा करण्यासाठी समोर यावे लागले आहे. त्यांनी ट्विट करत या सर्व आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more