आता प्रीमियम न भरताही शेतकर्‍यांना मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई, येथे सुरू आहे ‘ही’ नवीन योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोमवारी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली, त्याअंतर्गत दुष्काळ, अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना आता कोणताही प्रीमियम न भरता नुकसान भरपाई मिळणार आहे. या योजनेला ‘मुख्यमंत्री किसान सहाय योजना’ असे नाव देण्यात आले आहे. ही योजना खरीप पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजने (PMFBY) … Read more

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

शरद पवार २ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

अतिवृष्टीतने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. विदर्भाला सुद्धा या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. याच अनुषंगाने विदर्भातील ओल्या दुष्काळानं नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी आज विदर्भातील काटोल भागातील  कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला, उभ्या सोयाबीन पिकावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत मिळणार, खासदार जयसिध्देश्वर महाराज

उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सोलापूरचे खासदार शिवाचार्य जयसिध्देश्वर महाराज यांनी नान्नज,मोहीतेवाडी, रानमसले शिवारात जाऊन नुकसानग्रस्त द्राक्षे, कांदा, सोयाबीन, मका, फळबागा यांची पाहणी केली. यावेळी रानमसलेतील शेतकरी औदुंबर दामोदर गरड यांच्या या शेतातील अवकाळी पावसाने सडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी जयसिध्देश्वर यांनी केली.

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more