फडणवीसांविरोधात 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, मात्र अद्याप चौकशीला बोलावलं नाही

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय सूडबुद्धीने मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या विरोधात 3 … Read more

मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, माझी प्रकृती उत्तम – अमोल मिटकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार आमदार मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर येत होती. परंतु आता खुद्द अमोल मिटकरी यांनी हे वृत्त फेटाळले असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला अर्धांगवायूचा झटका आलेला नसून माझी प्रकृती उत्तम आहे असं म्हंटल आहे. यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हंटल की, आपल्या सर्वांच्या … Read more

उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका; अमोल मिटकरींचा चंद्रकांतदादांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील कोरोना परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादांना जोरदार … Read more

सचिन वाझेला भाजपची खासदारकी पक्की! ; अमोल मिटकरींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोघांनीही खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी … Read more

भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळेच अनिल देशमुखांचा राजीनामा” ट्वीटद्वारे अमोल मिटकरी यांनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर काही तासातच देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. “आर आर पाटील उर्फ आबा यांच्यानंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिलं गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला” अशी टीका राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटद्वारे भाजपवर केली आहे अमोल मिटकरी … Read more

तू बोलतो किती? तुझी औकात किती? नाव न घेता अमोल मिटकरींचा पडळकरांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विखारी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली राष्ट्रवादीचे नेते असून पडळकरांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टीका केली. अमोल मिटकरी म्हणाले, “तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? … Read more

अरे, तुमच्या बापाची पेंड आहे का ?? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा काढला ‘बाप’

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना आम्ही पण तुमचे बाप आहोत असं वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचा समारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा ‘बाप’ काढला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं, समितीच्या आवाराच्या बाहेर शेतमात विकणाऱ्यांकडून सेस गोळा करू, असा … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांची उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तिकीट जाहीर झाले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी ट्वीट करत उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी अनेकदा जाहीर सभेत कौतुक केले … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more