सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द ! अनेक खातेदारांचे पैसे अडकले, आपणही जमा केलेले नाहीत ना ?

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा (Vasantdada Nagari Sahakari Bank) परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँक म्हणाले की, बँक सध्याच्या ठेवीदारांचे संपूर्ण पैसे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार परत करू शकणार नाही. म्हणूनच त्यांचा परवाना रद्द (License Cancelled) केला जात आहे. या सहकारी बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे आणि लिक्विडेशनची … Read more

कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे … Read more

कराडातील चौघे दोन वर्षाकरिता तडीपार; सातारा जिल्ह्यासह कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून तडीपार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहराच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे शरीराविरूध्द गुन्हे दाखल असलेल्या चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन … Read more

दुभाजक तोडून कंटेनरने दोन दुचाकीस्वारांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर आलेल्या कंटेनरने कराड जवळ दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराच युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अमित पांडूरंग पाटील … Read more

RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, आता बँकेच्या ठेवीदारांचे काय होईल आणि किती पैसे परत मिळतील हे जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील कराडमधील अडचणीत आलेल्या ‘कराड जनता सहकारी बँक’ चा परवाना रद्द केला आहे. पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील बँकेच्या उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. परवाना रद्द झाल्यानंतर आता … Read more

नशा केलेल्या परदेशी तरुणीचा कराडजवळ फिल्मी थरार! पोलिसांनी पाठलाग केला असता अपघात होऊन जीप पलटी

कराड प्रतिनिधी | परदेशी युवतीने एक जीपगाडी चोरी करुन भर रस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर तरुणीने चरस ची नशा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कृषी महाविद्यालय, कराध येथे तिची जीप पलटी झाल्याने ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी चार च्या सुमाराच चिपळून च्या … Read more

कराडजवळ भीषण अपघात; मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळून 5 जण ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रजजवळ भीषण अपघात झाला आहे. मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळली आहे. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दिवाळीच्या पहाटे हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ  तारळी नदीच्या पुलावरुन … Read more

लॉकडाऊनमुळे धंद्याला फटका बसल्याने कराड तालुक्यातील व्यावसायिकांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमधील काळात व्यवसायला मोठा फटका बसल्याने वसंतगड येथील व्यावसायिकाने राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मारूती एकनाथ चव्हाण (वय- 55, सध्या रा. वसंतगड, मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पश्‍चिम सुपने येथील मारूती चव्हाण … Read more