‘घोर कलियुगात आपण करोनाशी लढू शकत नाही’- जस्टीस अरुण मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. न्यायमूर्ती … Read more

करोना इफेक्ट: अंबाबाई मंदिर प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने साडे तीन शक्ती पीठांपैकी महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर प्रवेशद्वार मध्यरात्री पासून बंद करण्यात आलय. अंबाबाईची आरती झाल्यानंतर मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आज सकाळपासून अंबाबाई मंदिर परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. मोजके पुजारी आणि … Read more

करोनाबाधित मृतकाच्या पत्नी-मुलाला करोनाची लागण; अंत्यसंस्काराची परवानगीही नाकारली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता खबरदारी म्हणून या दोघांनाही … Read more

कोल्हापूर शहरातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तपासणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील मंगल कार्यालय, लॉन व मॉलची कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. याठिकाणी मंगल कार्यालय, … Read more

लढा करोनाशी! भारताने जर्मनीला दिली तब्बल १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणघातक करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. सरकार लवकरच देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही लवकरच चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी जर्मनीकडून १० लाख टेस्टींग किट मागवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या … Read more

करोनाने घेतला महाराष्ट्रात पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय करोनाग्रस्त व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज उपचार घेत असलेल्या या करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेली व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर … Read more

कोरोना आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ‘करोना’ व्हायरसने थैमान घातलं असताना महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत … Read more

महाराष्ट्रात एकही कोरोनाचा रुग्ण नाही, तेव्हा अफवा पसरवू नका!- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिलं. दरम्यान, करोनाच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १० बेड स्वतंत्र ठेवण्याच्या … Read more

करोना व्हायरसची पंतप्रधान मोदींनी घेतली धास्ती; साजरी करणार नाहीत यंदाची होळी, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाची होळी साजरी करणार नसल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. करोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचा आधार घेत आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं यंदा होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये … Read more