६ CRPF जवानांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी ६ जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी याबाबत माहिती दिली आहे. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी ६ जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. … Read more

करोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाख देणार- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाने हैदोस घातला आहे. असं असतानाही जीवमुठीत घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. ड्युटीवर असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्तवपूर्ण बैठक पार … Read more

अन्यथा निझामुद्दीनऐवजी वसई झालं असत करोनाचं हॉटस्पॉट; महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील करोनाचं संकट अधिक गंभीर झालं आहे. एकीकडे या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना एक धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि … Read more

लॉकडाउनचा काळ वाढूही शकतो- अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. दरम्यान, करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा काळ कदाचित वाढूही शकतो असेही संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. लोकांनी गर्दी केली नाही, बेजबाबदारपणे … Read more

कोल्हापूरात २ करोना संशयित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक करोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, शहरातील २ करोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. मृतांपैकी एक ३७ वर्षीय तरुण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील विशेष करोना कक्षात भरती होता. तर … Read more

एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या १ लाख दहा हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. पुढील सूचना प्राप्त होईपर्यत वेतन न करण्याचे सरकारी आदेश असल्याची माहिती मिळत आहे. वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सरकारने आदेश दिले आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळं कमालीची नाराजी आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे म्हणून … Read more

निजामुद्दीन मरकज: पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू -जिल्हाधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी ‘मरकज’मधील कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली … Read more

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची बाब पोलिसांच्या अहवालात समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या सर्वाना शोधण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर … Read more

दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित; संपूर्ण परिसर सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. यासोबतच हजरत निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आला … Read more

करोनासंबंधी फेक न्यूजला आळा घाला अन्यथा.. – सुप्रीम कोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसपेक्षा त्याच्या धास्तीनेच अनेक लोकांचे जीव जातील. यामुळे फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले. फेक न्यूजमुळे नागरिकांचा गोंधळ उडतोय. म्हणून करोना व्हायरस संदर्भात देशातील प्रत्येक क्षणाची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे. यासाठी २४ तासांच्या आत वेबसाइट सुरू करून त्यावर … Read more