धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील गौरगाव येथे एका वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अनेकदा फूस लावून पळवून नेत बलात्कार केल्याची फिर्याद विवाहितेने तासगाव पोलिसात दिली आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात सागर भोरे याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता गौरगाव येथे पतीसह राहते. … Read more

परभणीत वाळू माफिया निर्ढावले ! तहसीलदारावर केला प्राणघातक हल्ला

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीपात्रात  अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी महसूल विभागाकडून प्रयत्न करण्यात येतोय .आज दुपारी असाच प्रयत्न करणाऱ्या  पाथरी तहसीलदारांच्या पथकावरच निर्ढावलेल्या वाळूमाफियांनी हल्ला चढवण्याचा प्रकार घडला असून नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केल्यानंतर तहसीलदार आणि वाळू … Read more

गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाला भोसकले

नागपूर प्रतिनिधी | मोबाईलवर गाणे वाजवण्यावरुन सख्ख्या भावाने दुसर्‍याला भोसकल्याची धक्कादायक घटना शनिवारी नागपूर येथे घडली. सदर घटनेमुळे प्रतापनगर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सतत मोबाइलवर गाणे वाजविण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. लहान भाऊ ऐकतच नसल्याने रागाच्या भरात मोठ्या भावाने त्याच्या पोटात चाकू भोसकला. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्यीतील … Read more

कराडात मटकाकिंगमुळे गुन्हेगारी फोफावतेय, पोलिस कारवाई करणार का?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात मटका खुलेआम चालू असून त्यांची पाळेमुळे ही कराड व मलकापूर शहरात रूजली असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत मटकाकिंग यांच्यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. या प्रकारामुळे वर्चस्ववाद समोर येत असून खूनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी या व्यवसायाची पाळेमुळे शोधून मटकाकिंगच्या मुसक्या … Read more

‘या’ कारणामुळे जिवलग मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या

विकलेल्या स्कुटीच्या पैशावरून झालेल्या वादानंतर एका मैत्रिणीनेच मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलोनी भागात घडली. विद्या चंद्रकांत तळेकर असे मृत महिलेचे नाव आहे तर शकीला उर्फ निलोफर शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

विट्यात दीड लाखांची देशी – विदेशी बनावटीची दारू जप्त

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी /  विटा – कराड मार्गावरून विनापरवाना होणारी दारूची वाहतूक विशेष पोलिस पथकाने पकडली. विट्यातील कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल आणि ओमनी चालक मंगेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ओमनी चालक मंगेश जाधव … Read more