पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा … Read more

पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती!

सांगली । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘आरक्षण आंदोलन’ उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा … Read more

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

जेव्हा अजित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते समोरासमोर येतात

बारामती प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलेच तापले आहे. सर्वत्र उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतही राष्ट्रवादी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. बारामतीत अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या भागात जाऊन जय पवार मतदारांच्या गाठीभेटी घेत … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा राजीनामा

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे … Read more

गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून लढणार विधानसभा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी त्यांनी सुरू केली आहे. या मतदारसंघात धनगर समाज व वंचित घटकाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने व लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात ५३ हजार मते मिळाल्याने त्यांनी मतदारसंघातून लढण्यासाठी पसंती दिली आहे. येत्या आठ दिवसात याची घोषणा होण्याची … Read more

गोपीचंद पडळकर यांचा सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design

सांगली प्रतिनधी । प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मोटारसायकल रॅली काढून पडळकर यांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नेते, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान खासदार … Read more