एक दिवस असा येईल ज्या दिवशी असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा म्हणतील- योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. निवडणूक जिकंण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडं भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात धार्मिक मुद्य्यांवरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वहिनीवर हनुमान चालीसाचे पठण केलं होतं. केजरीवाल यांच्या हनुमान चालीसा पठणाला धार्मिक रंग देत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

दिल्लीतील गोळाबारीच्या घटनांवरून अनुराग ठाकूर यांच्या विरोधात संसदेत जोरदार घोषणाबाजी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी भाषण करताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ”देश के गद्दारो को, गोली मारो..” अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. दरम्यान मागच्या ३ दिवसांत दिल्लीत जामिया मिलिया विद्यापीठाचा परिसर आणि शाहिनबाग परिसरात झालेल्या गोळीबारीच्या घटनामुळं विरोधकांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे.

शाहीन बागेत आंदोलन करणारे पाकिस्तानी आणि बांगलादेशी- भाजप खासदार राहुल सिन्हा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली आहे. एकीकडे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तर दुसरीकडे नेत्यांच्या जीभा सारख्या घसरू लागल्या आहेत. असंच एक वादग्रस्त वक्तव्य भाजपाच्या नेत्यानं केलं आहे. “दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश लोक पाकिस्तानी आणि बांगलादेशी आहे,” भाजपाचे नेते खासदार राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे.

जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू- भाजप खासदार

काल दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शाहीन बागमध्ये जमलेल्या जमावाला देशद्रोही ठरवत, अशा देशद्रोह्यांना गोळी मारायला पाहिजे, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले होते. त्यामुळं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयन्त केला जात आहे. या वक्तव्याचे समर्थन करताना CAA आणि NRCच्या विरोधात शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला एका भाजप खासदाराने लक्ष केलं आहे. शाहीन बागमधील परिस्थितीची तुलना काश्मीरशीसोबत करून दिल्लीच्या मतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदार परवेश वर्माने केलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

केजरीवालांच्या सेना दिवस ट्विटवरुन कुमार विश्वासांचा टोला; ट्विट व्हायरल

टीम हॅलो महाराष्ट्र। भारतीय सेना दिवसाच्या निमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैन्याला शुभेच्छा देणारा संदेश ट्विटरवर टाकला होता. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याच्या विश्वासार्हतेवर अरविंद केजरीवाल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. याचा आधार घेत पूर्वाश्रमीचे आप नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी … Read more

दिल्ली विधानसभेसाठी आपच्या ७० उमेदवारांची यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभरापेक्ष्या कमी अवधी शिल्लक राहिला असताना आम आदमी पक्षाने आपल्या सर्व ७० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मंगळवारी ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पातपारगंज विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवतील. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणीद्वारे निकाल हाती लागतील. शिक्षण, आरोग्य आणि सरकारी सेवा या मुद्य्यांवर आप सरकार ही निवडणूक लढवत आहे.

आम्ही केलेल्या कामामुळे आम्हीच विजयी होणार! अरविंद केजरीवाल यांचा विश्वास

आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तयार असून यावेळी जनता आमच्या कामावर आम्हाला मतदान करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दिल्लीच्या जनतेला आवाहन करत केजरीवाल म्हंणाले कि,”दिल्लीत आम्ही जर प्रामाणिकपणे चांगलं काम केलं असेल तरच आम्हाला मतदान करा अन्यथा मतदान करू नका.”

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर असून येत्या ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता आहे.