हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

टीम हॅलो महाराष्ट्र । दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश … Read more

मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी यांनी घेतल्या होत्या. यावेळी केंद्रात रस्ते, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीपद भूषवणाऱ्या नितीन गडकरी यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केलं. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं अत्यावश्यक असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे’ नागरिकांना आवाहन केले. तसेच ‘प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.’ मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं’ असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

देवेंद्र फडणवीस सरकारने ९६ टक्के आश्वासने पूर्ण केली; ‘भाजपा’च्या लोकनीती केंद्राचा दावा

लोकनीती संशोधन केंद्राने अहवाल प्रसिद्ध करून २०१४ च्या जाहीरनाम्यातील ९६ टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला. जातसमूह आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवतानाच विकासाचे राजकारण फडणवीस सरकारने केल्याचा युक्तिवाद ‘लोकनीती’चे संचालक आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी ‘वॉक द टॉक’ या अहवाल प्रकाशना वेळी केला.

कर्नाटक मधून जतला पाणी देणार – मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, … Read more

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

मी पुन्हा येणार म्हणणार्‍या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्‍यावर असताना एका शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून शेतकर्‍यांने आत्महत्या केल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. सदर घटना कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार संघात घटली आहे. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे सकाळी ११ वाजता सदर शेतकर्‍याने … Read more

शेतकर्‍यांचे उभे पीक केले उद्धवस्त, शिवबाच्या राज्यात वनाधिकाऱ्यांचे तुघलकी वागणे

अहमदनगर प्रतिनिधी | मुघलांनाही लाजवेल असे काम कर्जत तालुक्यात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी केले आहे. केवळ वन जमिनीवर भात लागवड केली म्हणून आदिवासींचे उभे पीक या अधिकाऱ्यांनी संगनमताने उध्वस्त केले आहे. माझ्या राज्यातील रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये अशी शिवनीती होती. सध्याचे राज्यकर्ते उठताबसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि काम मात्र त्याच्या … Read more

‘नाणार रिफायनरी’बाबत सरकार करणार फेरविचार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी प्रतिनिधी। नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश कोकणात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत फेरविचार करु असं म्हटलं आहे. नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत असं … Read more

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |‘प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे’ वक्तव्य गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी केलेल वक्तव्य हे बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ओला उबर चे नाव पुढे केले जात … Read more