के.एल.राहुलची जिगरबाज खेळी पाहून सेहवाग रिषभ पंतला म्हणाला, पंतला केवळ बोलायला जमतं!

न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात भारताने ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतासमोर ठेवलेलं १३३ धावांच भारतीय संघाने केवळ १७.३ षटकांत गाठले. भारताचा हा विजय के. एल राहुलच्या झुंझार खेळीने साकारला गेला. या सामन्यात के एल राहुलने ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्य. केएल राहुलच्या सामन्यातील कामगिरीमुळं प्रभावित झालेल्या माजी क्रिकेटर वीरेंदर सेहवागने राहुलचे कौतुक करताना रिषभ पंतवर टीका केली.

राहुल-श्रेयसच्या झुंजार खेळीने भारताचा दमदार विजय

श्रेयस अय्यरनेही शानदार फटकेबाजी करत राहुलला दमदार साथ दिली. दोघांच्या या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला.