फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान … Read more

पेरलेले सोयाबीन उगवले नाही ; शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे खरीप हंगामात शेतात मोठ्या कष्टाने पेरलेले सोयाबिन पीक उगवले नसल्याने आता दुबार पेरणी कशी करावी या प्रश्नाने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे शुक्रवार २६ जून रोजी घडली आहे. तालुक्यातील मर्डसगाव येथील तरुण शेतकरी विष्णु उद्धवराव शिंदे वय ३४ असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव … Read more

राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

मुंबई । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (ICMR ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण … Read more

वरुणराजाच्या जोरदार आगमनाने परभणी जिल्हा सुखावला!

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी शहरसह जिल्हामध्ये रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या पाऊसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरधार पडत पाणी पाणी केलयं. यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, पाऊस झाला आहे. झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका, जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणाऱ्या वाहतुकीवर झाला असून, परभणी – जिंतूर आणि परभणी – गंगाखेड रोडच्या रखडलेल्या … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more

नियंत्रणात्मक उपाययोजनेसाठी परभणी जिल्ह्यात हुमणी भुंगेरे व्यवस्थापन अभियान सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावात हुमणी किडींचे भुंगेरे मोठ्या संख्येने सायंकाळच्या वेळेला दिसून येत आहेत. त्यामुळे भुंगेऱ्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर या वर्षी मोठ्या प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे क्रमप्राप्त झाले असून शेतकऱ्यांनी हुमणी भुंग्यांसाठी वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा कृषी … Read more

परभणीत पुन्हा दोन कोरोना बाधीत सापडले; पाथरी तालुक्यानेही खाते उघडले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी उशिरा आलेल्या अहवालामध्ये दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यातील एक रुग्ण आतापर्यंत निरंक असणाऱ्या पाथरी तालुक्यातून असल्यामुळे आता हा तालुका कोरोनाग्रस्तांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. परभणीतील मिलिंद नगर एक व पाथरी तालुक्यातील रामपुरी रत्नेश्वर येथील एक महिला कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल आला … Read more

बापरे! परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत तालुक्यात ही शिरकाव !

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यात आज सकाळी व सायंकाळी आलेल्या स्वॅब तपासणी अहवालापैकी सात जणांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या तालुक्या पैकी मानवत तालुक्यात ही त्याचा शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील पाठवण्यात आलेल्या ३७ अहवाला पैकी जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे या गावातील वृद्ध … Read more

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बाधीतांच्या संख्येत ३१ ने वाढ

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्हावाशीयांसाठी मंगळवारची रात्र टेन्शन देणारी ठरली असून संध्याकाळी साडे आठ वाजता आलेल्या रुग्ण तपासणी अहवालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सायंकाळपर्यंतची ३६ रुग्णसंख्या आता जवळजवळ दुप्पट होत ६७ वर पोहोचली आहे. सापडलेले ३१ रुग्ण पूर्वी सापडलेल्या तालुक्यांमधीलच असल्याची आकडेवारी सांगत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोणा संसर्ग बाधित रुग्णांची … Read more

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येत नमाज पठण केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. दरम्यान आज … Read more