धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली तरुणीचा सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका ३६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रतनगड शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात महिलेने गुरुवारी रतनगड पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हावडा येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या सासरी डीडवाना येथे पायीच … Read more

अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला जबरदस्त तडाखा; आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्यूची नोंद

वृत्तसंस्था । बुधवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या अम्फान चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल राज्याला बसला आहे. राज्यात अम्फान चक्रीवदाळामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यूची नोंद झाल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही ममता बॅनर्जी … Read more

लोकं आमच्यावर थुंकतात; पश्चिम बंगालच्या ३०० नर्स नोकरी सोडून मणिपूरला माघारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोलकाताच्या अस्टपल्समध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३०० नर्सेसनी लोकांच्या वागणुकीमुळे दुखावल्यामुळे राजीनामा दिला आहे. आता त्या सर्व नर्सेस मणिपूरला रवाना झाल्या आहेत. आणखीही काही नर्सेस आता कोलकाता सोडण्याच्या तयारीत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नर्सेसनी दिलेला राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोलकातास्थित मणिपूर भवनचे उप निवासी आयुक्त जे.एस. जोयूरिता यांनी … Read more

मरकजवर प्रश्न विचारल्यावर भडकल्या ममता बॅनर्जी, म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीच्या निजामुद्दीन भागात, तबलीगी जमातच्या प्रकरणानंतर देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणात अचानक वाढ झाली.दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात यासंदर्भातील प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु पश्चिम बंगालमध्ये जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणाविषयी विचारले असता,त्या संतापल्या. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या ममता सरकारवर सतत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित … Read more

..जेव्हा ममता आणि शहा जेवणाच्या टेबलवर येतात आमने-सामने; फोटो व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशाच्या भुवनेश्वर येथे एकत्र जेवण केल्याचे छायाचित्र समोर आलं आहे. या छायाचित्रात त्यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान सुद्धा जेवताना दिसत आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार या सर्व नेत्यांनी पटनाईक यांच्या निवासस्थानी जेवण केले. … Read more

सरन्यायाधीशांनी भाजपाला फटकारलं; राजकारणासाठी कोर्टाचा वापर करू नका!

भाजपाचे प्रवक्ते गौरव बन्सल यांनी पश्चिम बंगालमध्ये कथितरित्या होत असलेल्या राजकीय हत्यांविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सरन्यायाधीश बोबडे यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी सुनवाणी झाली आहे. या प्रकरणात भाजपाच्या वतीनं ज्येष्ठ वकील गौरव भाटिया बाजू मांडत होते, तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टात उभे होते.

जेव्हा हत्ती शिरतो भारतीय लष्कराच्या छावणीत!

जंगलातील प्राण्यांचे विविध आणि मजेशीर व्हिडिओ कायम सोशल मीडियावर चांगलेच चर्चेमध्ये असतात. यामुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील हसीमारा येथील लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमधील डायनिंग हॉलमध्ये हत्ती सोंड हलवत शिरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती पुढे चालत जाताना वाटेत येणाऱ्या खुर्च्या आणि टेबल सोंडेने उचलून इकडे तिकडे फेकताना दिसत आहे.

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.